शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ देणार जीवन गौरव पुरस्कार

By admin | Updated: August 18, 2014 00:39 IST

औरंगाबाद : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

औरंगाबाद : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. २३ आॅगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असून, या समारंभात कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सामाजिक, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविले जाणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी मान्यवर व्यक्तींकडून प्रस्ताव किंवा त्यांच्याकडून माहिती मागविली जाणार नाही. विद्यापीठाची पाच सदस्यीय शोध समिती ही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शोध घेईल. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये उल्हास उढाण, डॉ. गीता पाटील, बीसीयूडीचे संचालक डॉ. कारभारी काळे हे सदस्य असतील. कुलसचिव डॉ. धनराज माने हे या समितीचे सदस्य सचिव असतील. पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र असेल.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक काल उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये झाली. त्या बैठकीत पुरस्कार देण्याबाबत चर्चा झाली. केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी पद्मश्री, पद्मभूषण आदी पुरस्काराने विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्तींना गौरविण्यात येते. त्या धर्तीवर विद्यापीठानेही वर्धापन दिनाचे औचित्य साधून यापुढे दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करावे, हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केल्यानंतर सदरील पुरस्कारासाठी स्वत: विद्यापीठाने समाजातील अशा मान्यवरांचा शोध घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय शोध समिती स्थापन केली. ही समिती समाजातील कर्तबगार व्यक्तींचा शोध घेणार असून, २३ आॅगस्ट रोजी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.