अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’मधील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे शुभमंगल सावधान!

By राजकुमार जोंधळे | Published: April 25, 2023 06:07 PM2023-04-25T18:07:32+5:302023-04-25T18:08:07+5:30

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला थाटात विवाह सोहळा

unique wedding ceremony; Shubhmangal of five thousand HIV-infected people in 'Sewalaya' Beware! | अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’मधील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे शुभमंगल सावधान!

अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’मधील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे शुभमंगल सावधान!

googlenewsNext

लातूर : औसा तालुक्यातील हासेगाव येथे असलेल्या सेवालयातील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचा विवाह साेहळा माेठ्या थाटामध्ये झाला. शुभमंगल सावधान... सावधान... म्हणत अक्षता पडल्यानंतर पाच जाेडप्यांनी बांधल्या रेशिमगाठी. हा विवाह साेहळा सेवालयातील हॅपी इंडियन व्हिलेजमध्ये मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती हाेती.

लातूरनजीक हासेगाव येथे प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यावेळी सेवालयात दाखल झालेली बालके आता सज्ञान झाली आहेत. आतापर्यंत यातील १८ जाेडप्यांचे विवाह झाले आहेत. यातील ७ जाेडपी हॅपी इंडियन व्हिलेजवर राहत आहेत. त्यांना एचआयव्हीमुक्त मुलेही जन्मली आहेत. आज त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. आता अन्य एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे विवाह शनिवारी माेठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडले. यावेळी वधू आणि वरांचे पालक म्हणून डाॅ. माया कुलकर्णी, भाजपचे संताेष मुक्ता, महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर लटपटे, मानवलाेकचे अनिकेत लाेहिया, प्रा. रूपाली गाेरे, रामेश्वर बद्दर, डाॅ. अशाेक गाणू, दीपक बनसाेडे, डाॅ. हनुमंत किनीकर, प्रिया लातूरकर, डाॅ. पवन चांडक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे, डाॅ. शैलजा बरुरे, हेमा राचमाले हे पालक म्हणून उपस्थित हाेते.

या अनाथ मुलांना आशीर्वाद देण्यासाठी शांतेश्वर मुक्ता, सतीश जेवळ, मारुती मगर, खय्यूम शेख, शिवसेनेचे संताेष साेमवंशी, शिवकांत बापटले, राजकुमार महाशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. माधव बावगे यांनी पाचही नवदाम्पत्यांचे विवाह सत्यशाेधकी पद्धतीने लावले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित हाेते.

Web Title: unique wedding ceremony; Shubhmangal of five thousand HIV-infected people in 'Sewalaya' Beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.