बजाजनगरात अखंड हरिनाम सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:49+5:302021-02-05T04:10:49+5:30
------------------------------- साजापूर रस्त्याचे काम अर्धवट वाळूज महानगर : वडगावातून साजापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास ...

बजाजनगरात अखंड हरिनाम सप्ताह
-------------------------------
साजापूर रस्त्याचे काम अर्धवट
वाळूज महानगर : वडगावातून साजापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी वडगावपासून पाझरतलावाच्या पुढे या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र जवळपास अर्ध्या किलोमीटर रस्त्याचे काम हद्दीच्या वादात अडकल्याने ये-जा करणाऱ्यांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे.
--------------------------
वृध्द व्यक्तीचा मृत्यू
वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगरात बुधवारी (दि.२७) बेशुद्ध वस्थेत मिळून आलेल्या ६० वर्षीय वृध्दाचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दत्तू संपत हिवाळे (६० रा. तीसगाव परिसर) असे मृताचे नाव आहे. सिडको महानगरातील बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास अनोळखी वृद्ध बेशुद्ध पडल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
-------------------------
वडगावातून महिला बेपत्ता
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथून २९ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ज्योती परमेश्वर वरे (२९, रा. सलामपुरेनगर, वडगाव) ही २६ जानेवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घरातून बेपत्ता झाली आहे. परमेश्वर वरे यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
----------------------------------
राधिका सवईला गुणवंत विद्यार्थी पुरस्कार
वाळूज महानगर : बजाजनगरातील शहीद भगतसिंह हायस्कूलमधील विद्यार्थिनी राधिका राजेंद्र सवई ही दहावी परीक्षेत प्रथम आल्याने तिला कॉ. छगनराव साबळे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्याला कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, कॉ. दामोदर मानकापे, मुख्याध्यापक गौतम शिंदेल, नितीन देशमुख, अनामिका गोरे, राहुल साबळे आदींची उपस्थिती होती.
--------------------------