औरंगाबादेतील सातारा परिसरात अनोळखी मृतदेह आढळ्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:35 IST2018-07-23T13:22:39+5:302018-07-23T13:35:00+5:30
मृतदेहाला पोलिसांच्या गस्ती पथकाने शासकीय रुग्णालय घाटी येथे उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असून अधिक तपास सुरु आहे.

औरंगाबादेतील सातारा परिसरात अनोळखी मृतदेह आढळ्याने खळबळ
औरंगाबाद : सातारा परिसरात आज सकाळी ६ वाजता एक अनोळखी मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली. मृतदेहाला पोलिसांच्या गस्ती पथकाने शासकीय रुग्णालय घाटी येथे उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असून अधिक तपास सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी ६ वाजता सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिर कमान येथे एका युवकाचा मृतदेह आढळ्याची माहिती पोलिसांच्या गस्ती पथकाला मिळाली. हेकॉ. नारायण बर्हाटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे साधारण २८-३० वयोगटातील एका युवकाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळ ओळखीचा कसलाही पुरावा मिळाला नाही. यानंतर गस्ती पथकाने मृतदेह ताब्यात घेत शासकीय रुग्णालय घाटी येथे उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.