दुर्दैवी घटना ! पाय घसरून पडल्याने पोटात सळई घुसून मजुराचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 19:45 IST2021-06-07T19:45:07+5:302021-06-07T19:45:26+5:30

घराच्या पायऱ्या चढत असतांना अचानक पाय घसरून पडला.

Unfortunately! The end of the labor by inserting a spear into the abdomen due to slipping of the legs | दुर्दैवी घटना ! पाय घसरून पडल्याने पोटात सळई घुसून मजुराचा अंत

दुर्दैवी घटना ! पाय घसरून पडल्याने पोटात सळई घुसून मजुराचा अंत

ठळक मुद्दे सळई पोटात खोलपर्यंत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.

औरंगाबाद: जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या मजूर पाय घसरून पडल्याने त्याच्या पोटात सळई घुसल्याने गंभीर जखमी होऊन मरण पावला. ही घटना सोमवारी(७ जून) सकाळी १० वाजता तक्षशिलानगरात घडली.

शेख फरहान शेख उस्मान (३०, रा. असेफिया कॉलनी) असे मयताचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार तक्षशिलानगरातील रहिवासी रिजवाना बेगम यांना त्यांच्या जुन्या घराच्या दुरूस्तीचे काम करायचे होते. हे काम करण्यासाठी त्यांनी शेख फरहान यांना आज सकाळी बोलावले होते. कामाचे स्वरूप पाहुन ते कामाचा सौदा करणार होते. आज सकाळी फरहान काम पाहण्यासाठी रिजवानाबेगम यांच्या निवासस्थानी गेला. यावेळी घराच्या पायऱ्या चढत असतांना अचानक पाय घसरून पडला.

यावेळी खाली असलेली उघडी सळई फरहानच्या पोटात खोलपर्यंत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ झालेल्या फरहानला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास फरहानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेविषयी जिंसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार जेढर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Unfortunately! The end of the labor by inserting a spear into the abdomen due to slipping of the legs