नैराश्येतून बेरोजगार तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 18:54 IST2021-06-15T18:53:28+5:302021-06-15T18:54:08+5:30
शेख मझहर हे चार ते पाच महिन्यापासून बेरोजगार होते.

नैराश्येतून बेरोजगार तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद: हिलाल कॉलनीतील रहिवासी शेख मझहर शेख बाबर (३४) यांनी नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ जून रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शेख मझहर हे चार ते पाच महिन्यापासून बेरोजगार होते. काम मिळत नाही आणि पत्नीही माहेरी निघून गेल्यामुळे ते फारसे कुणाशी बोलत नव्हते. त्यांना मानसिक विकार असल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर घाटीतील डॉक्टरांकडे उपचार केले जात होते. दरम्यान मंगळवारी पहाटे त्यांनी खोलीतील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांना दिसताच त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलीस हवालदार पोपट काकडे तपास करीत आहेत.