शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शहर व परिसरात अंडरग्राऊंड वायरिंग सिस्टीम हवी...

By admin | Updated: August 19, 2014 02:17 IST

नजीर शेख , औरंगाबाद नियोजनबद्ध शहर, नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता, तसेच दर्जेदार आणि विनाअडथळा वीजसेवेसाठी शहरात आणि शहराच्या परिसरात नव्याने विकसित होत

नजीर शेख , औरंगाबादनियोजनबद्ध शहर, नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता, तसेच दर्जेदार आणि विनाअडथळा वीजसेवेसाठी शहरात आणि शहराच्या परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या गावांमध्ये ‘अंडरग्राऊंड वायरिंग सिस्टीम’ असायला हवी, असे मत महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास म्हस्के यांनी व्यक्त केले. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एक सरकारी कंपनीचा अधिकारी म्हणून मला देशांतील अनेक ठिकाणी तसेच परदेशात जायची संधी मिळाली. अनेक शहरांमध्ये अंडरग्राऊंड केबल सिस्टीम आहे. आपल्या शहरात व आसपासच्या गावांमध्ये ‘ओव्हरहेड वायरिंग’ (डोक्यावरू न जाणारी) सिस्टीम आहे. अनेक ठिकाणी आधी विजेची वायर टाकली जाते. नंतरच्या काळात तिथे वसाहती होतात व नंतर नागरिकांच्या तक्रारी येतात की, आमच्या घरावरू न वायर जात आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. शहरातील अनेक वसाहती या अशा मृत्यूच्या तोंडाशी वसलेल्या आहेत. आपल्या शहरातील जुन्या भागात ‘ड्रम’ प्रोेजेक्टअंतर्गत काही ठिकाणी भूमिगत वीज केबल टाकण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण शहरात अजून ही व्यवस्था नाही. विद्युत लाईनसाठी सुरक्षित बेल्ट ही कल्पना अजून आपल्या शहरात रुजली नाही. औरंगाबाद शहराच्या आसपास बिडकीन आणि शेंद्रा परिसरात डीएमआयसीमध्ये स्मार्ट सिटी वसणार आहे. ही वसाहत नियोजनबद्ध असेल; मात्र त्याचवेळी त्या शहराच्या आसपास वाढणाऱ्या वसाहतींमध्ये अशी सुविधा असेलच असे सांगता येत नाही. कोणत्याही शहराच्या आराखड्यात आता पॉवर केबलिंगचे नियोजन असणे, त्यासाठी डक्ट आणि ट्रान्समिशन लाईन असणे आवश्यक ठरते. यामुळे शहराची सुंदरता वाढण्यास मदत होते. शहराचा एक नागरिक म्हणून मला असे वाटते की, शहरात विजेसाठी ‘अंडरग्राऊंड केबलिंग’ करावयाची झाल्यास पैसा लागेल. मात्र, त्याची तयारी महापालिका तसेच महावितरण किंवा जीटीएल यांना करावी लागेल. अरुंद गल्ल्यांमध्येही आपण अंडरग्राऊंड केबलिंग करू शकतो. हा खर्च मोठा आहे. मात्र, नियोजनबद्ध शहर म्हणून हे आपल्याला करावे लागेल.