दुष्काळाच्या सावटाखाली जिल्ह्यात बैल पोळा साजरा
By Admin | Updated: August 26, 2014 00:23 IST2014-08-26T00:23:24+5:302014-08-26T00:23:24+5:30
उस्मानाबाद : लोकमत चमू जिल्ह्यात सोमवारी दुष्काळाच्या सावटाखालीच बैलपोळा सण साजरा करण्यात आला़ पावसाने दिलेली ओढ, बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने

दुष्काळाच्या सावटाखाली जिल्ह्यात बैल पोळा साजरा
उस्मानाबाद : लोकमत चमू
जिल्ह्यात सोमवारी दुष्काळाच्या सावटाखालीच बैलपोळा सण साजरा करण्यात आला़ पावसाने दिलेली ओढ, बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने अनेकांनी साधेपणाने, पारंपारिक पध्दतीने हा सण साजरा केला़
बैल पोळ्यानिमित्त रविवारी खांदेमळणीनिमित्त बैलांना धुवून हळद लावण्यात आली़ तर पोळा सणानिमित्त सोमवारी सकाळी बैलांना सजवून गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली़ मारूती मंदिराला प्रदिक्षणा घातल्यानंतर विधीवत लग्न सोहळा झाला़ या सणानिमित्त शेतकरी बैलांचा उपवास धरतो़ विवाह सोहळ्यानंतर बैलांना पुरणपोळी खाऊ घातल्यानंतर बळीराजा हा उपवास सोडतो़ अनेक ठिकाणी बैलांची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली़ ईट येथे बैलांपुढे बँड पथकासह नृत्यांगनांना पाचरण करण्यात आले आहे़ या सणावर दुष्काळाचा प्रभावही दिसून आला़ एकीकडे साठवण तलाव कोरडेठाक असल्याने शेतातील विहिरी, कुपनलिकांवर बैलांना धुण्यात आले़ अनेकांनी साधेपणाने मिरवणूक काढून सण साजरा केला़ (प्रतिनिधी)