शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

अवैैध वाहतूक बंद; बसचे उत्पन्न वाढले

By admin | Updated: August 18, 2014 00:31 IST

कळमनुरी : जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक एन.अंबिका या रूजू होताच फोफावलेल्या अवैध वाहतुकीस त्यांनी चांगलाच लगाम लावला आहे.

कळमनुरी : जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक एन.अंबिका या रूजू होताच फोफावलेल्या अवैध वाहतुकीस त्यांनी चांगलाच लगाम लावला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कळमनुरी आगाराचे उत्पन्न २० टक्क्यांनी वाढले आहे. मागील ३ आॅगस्टपासून अवैध वाहतुक थांबली आहे. स्थानिक पोलिसही अवैध वाहतुकीच्या वाहनांवरही कारवाई करत आहेत. त्यामुळे अवैध वाहतुकीला पूर्णपणे आळा बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कळमनुरी आगाराचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे. ४ आॅगस्ट रोजी आगाराचे भारमान ६६.४० टक्के होते. दर दिवशी आगाराचे ६० ते ७० हजारांच्या जवळपास येत आहे. आगारात ३८ बसेस असून चालक ७८ व वाहक ७२ आहेत. या आगारात १२ ते १५ चालक वाहकांची गरज आहे. वाहतुक नियंत्रक व लिपिकाची पदे रिक्त असल्याने चालक-वाहक त्यांची कामे करीत आहेत. बसेस जुन्या व खिळखिळ्या झाल्याने भंगार अवस्थेत आहेत. सध्या २ ते ३ बसेसला डिझेलचे अ‍ॅव्हरेज येत नाही. लांब पल्ल्याच्या बसेस चालविण्यासाठी आगाराला नवीन २० बसेसची आवश्यकता आहे; परंतु आगारात ३ बसेसच लांब पल्ल्याच्या प्रवासाला नेण्यासाठी उपलब्ध आहेत. २ लाख कि. मी. च्या आत चाललेल्या बसेस लांब पल्ल्यासाठी चालतात. परंतु येथे तशा ३ बसेसच उपलब्ध आहेत त्यामुळे कळमनुरी येथील आगाराला बसेसची आवश्यकता आहे. लांब पल्ल्याच्या बसगाड्याचे भारमान ८० ते ९० टक्के येते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेस सोडणे आगाराला गरजेचे आहे. आता आगाराचे उत्पन्न वाढल्याने प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करून उत्पन्न वाढीसाठी आगार प्रमुख रहीम सिद्दीकी, एन. एल. चौधरी, अकबर पठाण, डी. एम. कल्याणकर, शेख सलीमोद्दीन यांच्यासह चालक -वाहक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)