शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

By admin | Updated: July 29, 2014 01:11 IST

नांदेड : शहरातील विविध भागात विनापरवाना आणि अनधिकृतपणे लावण्यात आलेले १८ होर्डिंग्ज सोमवारी मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने काढून टाकले़

नांदेड : शहरातील विविध भागात विनापरवाना आणि अनधिकृतपणे लावण्यात आलेले १८ होर्डिंग्ज सोमवारी मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने काढून टाकले़ शिवाजीनगर येथील काही लोकांनी होर्डिंग्ज काढण्यास आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे सांगितल्यानंतर लोक शांत झाले़ महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाने आज अचानकपणे ही मोहीम राबविली़ मुंबई उच्च न्यायालयाने २१ फेब्रुवारी २०१४ रोजी दिलेल्या निर्देशानुसार विनापरवानगी व अनधिकृतपणे असलेले होर्डिंग्ज काढून घेण्याची कारवाई यापूर्वी देखील करण्यात आली असून काही प्रकरणात गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत़ शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून बेकायदेशीर होर्डिंग्जवर प्रतिबंध करण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत़त्यानुसार प्रभारी आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी केलेल्या सूचनेनुसार उपायुक्त रत्नाकर वाघमारे व राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, सुधीर इंगोले, एस़ टी़ मोरे, मोहन डिंकाळे, गणेश शिंगे, सहायक पोलिस निरीक्षक भराडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कर निरीक्षक व पोलिस पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच सार्वजनिक मालमत्तेवर लावलेले १८ होर्डिंग्ज काढून टाकले़ यामध्ये शिवाजीनगर झोन मधील ४, अशोकनगर ५ , इतवारा ३ , वजिराबाद ४ व तरोडा येथील २ होर्डिंग्जचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)परवानगीशिवाय होर्डिंग्ज नको शहरात होर्डिंग्ज लावायचे आहेत, त्यांनी महापालिकेची रितसर परवानगी घेऊन दिलेल्या मुदतीतच होर्डिंग्ज लावावे़ जाहिरातीसाठी महापालिकेने काही कायम स्थळे निश्चित करून अभिकर्त्यांची नेमणूक केली आहे़ त्यांच्याकडून परवानगी घेऊनच आपले होर्डिंग्ज लावावेत़ वाहतूक व रहदारीला अडथळा होणार नाही, अशा खाजगी जागेवर होर्डिंग्जला शक्य तितक्या लवकर तात्पुरती परवानगी देण्यात येईल़ परंतु परवानगी असल्याशिवाय कोणीही दृष्टीगोचर होर्डिंग्ज लावून सार्वजनिक मालमत्ता विरूपण कायद्याचा भंग करू नये तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन प्रभारी आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी केले आहे़