दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 01:11 IST2016-10-19T00:57:04+5:302016-10-19T01:11:00+5:30
औरंगाबाद : जुना मोंढा येथील व्यापाऱ्यांनी नवीन मोंढ्यात स्थलांतरित व्हावे यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार,

दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना अल्टिमेटम
औरंगाबाद : जुना मोंढा येथील व्यापाऱ्यांनी नवीन मोंढ्यात स्थलांतरित व्हावे यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी सकाळी जुना मोंढा येथील रस्त्यांची पाहणी केली. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रशासनाने दिलेल्या अल्टिमेटने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ११ वाजता दोन्ही अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी मोंढ्यातील व्यापाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी सेमी होलसेलर्सचे अध्यक्ष संजय कांकरिया, बाजार समितीचे सभापती संजय औताडे आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद : येत्या २५ तारखेपर्यंत मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी जाधववाडीत स्थलांतर करावे नसता मालट्रक आत येऊ देणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी व्यापाऱ्यांना ठणकावून सांगितले. त्यांच्यासोबत मनपा आयुक्तसुद्धा आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हे मोंढा स्थलांतरासाठी पोलीस व मनपाचा धाक दाखवीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
दिवाळी तोंडावर आली असताना मंगळवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांनी मोंढ्यात भेट दिली. मोंढ्यातील रहदारीची पाहणी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी व्यापाऱ्यांना मोंढा स्थलांतरासाठी २५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली. त्यानंतर माल घेऊन एकही ट्रक मोंढ्यात येणार नाही, असा इशाराही दिला. ऐन दिवाळीच्या तोंडावर मोंढा स्थलांतराच्या मुद्याने उसळी घेतल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. व्यापाऱ्यांनी आरोप केला की, मोंढा स्थलांतराची जबाबदारी कृउबा समितीची आहे. मात्र, सभापती औताडे यांनी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना सोबत घेऊन व्यापाऱ्यांना धाक दाखविण्यास सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की,स्थलांतरासाठी व्यापारी तयार आहेत. आम्ही बाजार समितीत कोट्यवधी रुपये भरले आहेत, असे असताना बाजार समितीच व्यापाऱ्यांना जाधववाडीत जागा देत नाही. याविषयी न्यायालयात याचिका दाखल आहे, असे असतानाही मोंढा स्थलांतराचा मुद्दा उकरून काढला जात आहे. व्यापाऱ्यांनी प्रश्न केला की, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी तोंडावर आली असताना मोंढा स्थलांतराचा विषय काढून बाजार समितीला काय साधायचे आहे. स्थलांतराचे काम बाजार समितीचे आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांची काय गरज, असा प्रश्नही ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी विचारला.