शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

उलेमा बोर्डाचा वंचितला पाठिंबा; २५ मुस्लिम उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 2:36 AM

कापसाला शासनाने ५ हजार ५०० रु. प्रति क्विंटल भाव जाहीर केला; पण दीड हजार रुपये स्वस्ताने अमेरिकेचा कापूस भारतात येतोय.

औरंगाबाद : ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केला असून, त्यांच्या पाठिंब्यावर वंचित बहुजन आघाडी एकूण २५ मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवत असल्याची घोषणा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत केली. बोर्डाचे अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख व नायब अन्सारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

जालना येथील आलुतेदार-बलुतेदार सत्ता संपादन मेळाव्यास मार्गदर्शन करून ते सायंकाळी औरंगाबादेत आले होते. ‘एमआयएम सोडून गेलेली आहे. आम्ही नाही. यशासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा. असदुद्दीन ओवेसी हे मला मोठे भाऊ मानतात. ते नाते अजूनही कायम आहे. फक्त राजकीय संबंध संपले. भूमिका त्यांनी बदलली. आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, वामनराव चटपांची शेतकरी संघटना, भाकप, माकप, सत्यशोधक कम्युनिष्ट पार्टी, लाल निशाण पक्ष यांच्याशी आमची आघाडी होईल.नेते संपवले, कार्यकर्ते संपवले का हा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजप पक्ष प्रवेशासंबंधाने नोंदवत आंबेडकर म्हणाले, आम्ही भाजपची बी टीम, रा.स्व. संघ धार्जिणे ही टीका मागच्या चाळीस वर्षांपासून सहन करीत आलो आहोत; पण रा.स्व. संघाच्या विरोधात माझ्याइतके ताकदीने लढणारे कुणी नसावे. भान ठेवून टीका केली जायला हवी. अशा टीकेची मला चिंता नाही.

कापसाला शासनाने ५ हजार ५०० रु. प्रति क्विंटल भाव जाहीर केला; पण दीड हजार रुपये स्वस्ताने अमेरिकेचा कापूस भारतात येतोय. याचा अर्थ सरकार भारतीय कापूस उत्पादकांना ३ हजार ५०० च्या वर भाव देऊ शकणार नाही. म्हणजेच ट्रम्पला मोदींनी दिलेल्या टाळीची किंमत मोजावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी १० आॅक्टोबरला कापूस खरेदीचा मुहूर्त काढावा. या निवडणुकीत शेतकरी जातीला महत्त्व देतो की कापसाच्या भावाला हे पाहावयाचे आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.

विरोधी पक्ष जगला नाही तर वाटोळे...एखाद्या दारुड्या माणसासारखी या सरकारची अवस्था झाली आहे. महाराष्ट्रातही २५० जागा आमच्याच निवडून येतील, असा दावा आता मुख्यमंत्री करू लागले आहेत. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत हवा. तो जगला नाही तर वाटोळे होईल. बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांची वाटचाल जणू हुुकूमशाहीकडेच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीElectionनिवडणूक