शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पदवीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, "मग या पदवीचा वापर काय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 20:52 IST

Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे घणाघाती टीका केली. आपले पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला का वाटू नये. हा कोणता न्याय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी पाहायला मिळावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कोर्टाने २५ हजार रुपये दंड ठोठावला होता. आज पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे घणाघाती टीका केली. आपले पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला का वाटू नये. हा कोणता न्याय आहे. पदवी मागितली तर पदवी दाखवायची नाही. दाखवणार नाही म्हणायचं आणि पदवीबाबत विचारलं तर २५ हजार रुपये दंड. मग या पदवीचा वापर दंड वसूल करण्यासाठी करताय की काय असा टोला त्यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज देशभरात लाखो युवक सुशिक्षित, पदवीधर आहेत. अनेकांची परिस्थिती शिक्षण पूर्ण करण्यासारखी नाही.  त्यातील अनेकांनी पदवी मिळवलेली आहे. हो मिळवलेली आहे कारण हल्ली डॉक्टरेटसुद्धा विकत घेता येते, असे म्हणतात. अनेकजण असे आहेत ज्यांना पदव्या दाखवून दाखवून देखील किंमत मिळत नाही. पदवीधर आहे म्हणूनही कुणी किंमत देत नाही. पदवीधर आहे, असं सांगितल्यावर पदवी घेऊन घरी जा आणि भिंतीवर चिकटवा, असं सांगितलं जातं. एकाबाजूला पदवी दाखवून किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवलायला मागितली तर २५ हजार रुपये दंड होतो. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे?  कोणत्या कॉलेजची आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

आमच्या कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचला आहे. असा अभिमान त्या कॉलेजला वाटला पाहिजे. आज या व्यासपीठावर मी आहे, जयंतराव पाटील आहेत. आम्ही दोघेही एकाच शाळेचे विद्यार्थी. आपलं मंत्रिमंडळ जेव्हा आलं. शाळेने मोठ्या अभिमानाने आम्हाला बोलावलं. आपल्या शाळेतील विद्यार्थी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री झाले याचा मोठा अभिमान या शाळेला वाटला.  असा अभिमान आपले पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला का वाटू नये. हा कोणता न्याय आहे. पदवी मागितली तर पदवी दाखवायची नाही. दाखवणार नाही आणि विचारलं तर २५ हजार रुपये दंड. मग या पदवीचा वापर दंड भरण्यासाठी करताय की काय, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीEducationशिक्षण