शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

'आठवडी बाजाराच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव!' दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 20:00 IST

छ. संभाजीनगरमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयावरून राडा; अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेचे तीव्र आंदोलन.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील विविध भागांत भरणारे पारंपरिक आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने, शिवसेना (यूबीटी) आक्रमक झाली आहे. सोमवारी (दि. २७) शहानूरवाडी येथील आठवडी बाजारात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

बिल्डर लॉबीला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न?"महापालिका प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा कट सत्ताधाऱ्यांनी रचला आहे," असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला. हे बाजार बंद केल्यास गरिबांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे हे बाजार आम्ही कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, या जागा अधिकृतपणे 'हॉकर्स झोन' म्हणून जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

बाजारात खरेदी करत साधला संवादआंदोलनादरम्यान १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन बाजारात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी विक्रेत्यांकडून भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात उपनेते सुभाष पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Weekly Market Land Grab! Danve Accuses Rulers of Conspiracy.

Web Summary : Shiv Sena (UBT) protests Aurangabad's decision to close weekly markets, fearing it favors builders and harms farmers. Danve demands official 'Hawkers Zone' designation, ensuring livelihoods aren't threatened.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAmbadas Danveअंबादास दानवेMunicipal Corporationनगर पालिका