शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

उद्धव की राज?; कोणत्या ठाकरेंची औरंगाबादमधील सभा मोठी?... हा घ्या ग्राउंड रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 9:00 PM

राज ठाकरेंच्या एल्गारानंतर औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचा हुंकार

औरंगाबाद:मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजीची सभा ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली त्याच ठिकाणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभास्थळी आगमन होणापूर्वी पासूनच एक वेगळीच चर्चा रंगली. राज ठाकरे यांच्या सभेपेक्षा आज जास्त गर्दी आहे की कमी ? सभास्थळी आणि बाहेरही शिवसैनिक, विरोधाकांसह नागरिकही सभेच्या गर्दीचा अंदाज घेण्यात व्यस्त होते. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर मुंबई, ठाणेनंतर औरंगाबाद येथे सभा घेतली. १ मे रोजी झालेल्या या सभेस परवानगी मिळण्यापासून मोठ्या नाटकीय घडामोडी घडल्या होती. राज ठाकरे यांच्या सभेला अटीशर्थीवर परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज यांची सभा झाली. हे मैदान पूर्ण भरले होते. तसेच मैदानाच्या बाहेरही अनेक जण उभे असल्याचे चित्र होते. येथे जवळपास ३५ हजार ते ४० हजार जण उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, शिवसेनेच्या मराठवाड्यातील शाखेच्या ८ जून रोजीच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्र्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच सभा होणार अशी घोषणा शिवसेनेने केली.  

शिवसेनेची सभा मैदानाबाहेर शहरात तीन ठिकाणी मोठ्या पडद्यावर लाईव्ह त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा राज यांची सभा झाली त्याच मैदानावर आयोजित करण्यात आली. मैदान खचाखच भरून अनेक शिवसैनिक बाहेर उभे होते. तर शहरातील तीन ठिकाणी मोठे पडदे लावून सभा लाईव्ह दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभा स्थळी येऊ न शकणारे शिवसैनिक आणि नागरिकांसाठी शहरातील खडकेश्वर, मल्टीपर्पज हायस्कूल आणि कर्णपुरा येथे मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. सभेसाठी आलेल्या काही जुन्या शिवसैनिकांच्या मते आजच्या सभेसाठी मैदानात ५० हजारांपेक्षा अधिक शिवसैनिक होते. तर या विक्रमी गर्दीसोबतच शहरातील तीन ठिकाणी लावलेल्या पडद्यावर देखील हजारो शिवसैनिक, नागरिकांनी सभा पाहिली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील आपल्या भाषणात शिवसैनिकांनी आज स्वतःचाच विक्रम मोडला असल्याचे म्हटले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेAurangabadऔरंगाबाद