मोकाट कुत्रा चावल्याने दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 12:05 IST2019-09-11T12:02:53+5:302019-09-11T12:05:10+5:30

पंधरा दिवसापूर्वी अक्षराला मोकाट कुत्र्याने चेहऱ्यावर चावा घेतला होता.

Two-year-old girl dies after being bitten by a dog | मोकाट कुत्रा चावल्याने दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू 

मोकाट कुत्रा चावल्याने दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू 

औरंगाबाद : मोकाट कुत्रा चावल्याने दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आज औरंगाबादेत घडली. अक्षरा राजू वावरे ( राहणार मुकुंदवाडी) असे मयत मुलीचे नाव आहे.

याविषयी घाटी रुग्णालयाकडून मिळालेली माहिती अशी, पंधरा दिवसापूर्वी अक्षराला मोकाट कुत्र्याने चेहऱ्यावर चावा घेतला होता. तिच्यावर उपचार करण्यात आले होते रेबीज लस देण्यात आली होती. केवळ एक लस देणे शिल्लक होते. मात्र अचानक तिची काल तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी लागलीच तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्या उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हते. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी तिचा मृत्यू झाला.

Web Title: Two-year-old girl dies after being bitten by a dog