सरकत्या जिन्यात पडून दोन महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 22:53 IST2019-08-25T22:53:05+5:302019-08-25T22:53:17+5:30
रेल्वेस्टेशनवरील सरकत्या जिन्यात पाय अडकून दोन महिला जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

सरकत्या जिन्यात पडून दोन महिला जखमी
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील सरकत्या जिन्यात पाय अडकून दोन महिला जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यातील एका महिलेच्या दुखापत झाली. तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निलम्मा गुंडारेड्डी (५५) असे जखमी महिला प्रवशाचे नाव आहे. सरकत्या जिन्यावरून जाताना अचानक त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला.
या घटनेची रेल्वे अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानंतर दाखल झालेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाचे सुनील नलावडे, एस. एन. ढवळे, याहिया खान पठाण, माजीत खान आदींनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.