भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:37 IST2018-12-30T22:37:39+5:302018-12-30T22:37:51+5:30

भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंढरपूरातील महावीर चौकात घडली.

Two wheelers killed by a truck | भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

वाळूज महानगर : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंढरपूरातील महावीर चौकात घडली. सय्यद समीर सय्यद हमीद (१८ रा.गोलवाडी) असे मृताचे नाव असून, घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.


सय्यद समीर सय्यद हमीद हा पंढरपूरातील एका दुचाकी शोरुममध्ये दोन महिन्यापासून शिकाऊ कामगार म्हणून काम करीत होता. शोरुम रविवारी बंद झाल्यानंतर सय्यद समीर हा स्कुटी (एम.एच.२०, ए.एच.२६३२) वर स्वार होऊन पंढरपुरातून दुपारी ४ वाजता गोलवाडी येथे घराकडे जात होता. महावीर चौकात पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक (एम.एच.२०-ए.टी.४८१७) चालकाने सय्यद समीर याच्या स्कुटीला जोराची धडक दिली.

समीर गंभीर जखमी झाला. इतर वाहनधारक व नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या सय्यद समीर यास्ला शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी सय्यद इम्रान यांच्या तक्रारीवरुन ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्टटाईम काम करुन घेत होता शिक्षण
मयत सय्यद समीर याच्या घरची परिस्थती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील रिक्षा चालवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सय्यद समीर हा शहरातील एस.बी.महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. कुटुंबाची ओढाताण होत असल्यामुळे सय्यद समीर हा दोन महिन्यापासून पंढरपूरातील एका दुचाकी शोरुममध्ये शिकाऊ कामगार म्हणून काम करीत होता.

Web Title: Two wheelers killed by a truck