टँकरच्या धडकेने दुचाकीवरील पत्नी जागीच ठार, पती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:22 IST2018-12-25T00:22:22+5:302018-12-25T00:22:35+5:30
औरंगाबाद-वैजापूर रस्त्यावरील खडकी पुलाजवळील वळणावर सोमवारी दुपारी तीन वाजता टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली, तर पती जखमी झाला.

टँकरच्या धडकेने दुचाकीवरील पत्नी जागीच ठार, पती जखमी
देवगाव रंगारी : औरंगाबाद-वैजापूर रस्त्यावरील खडकी पुलाजवळील वळणावर सोमवारी दुपारी तीन वाजता टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली, तर पती जखमी झाला.
देवगाव रंगारी येथे आठवडी बाजार असल्याने शिवगाव येथील बाबासाहेब एकनाथ कनगरे व आशा बाबासाहेब कनगरे हे दाम्पत्य बाजारासाठी आले होते. बाजार आटोपून ते परतत असताना मागून येणाऱ्या टँकरने त्यांना जोराची धडक दिली. आशा कनगरे या टँकरच्या टायरखाली आल्याने जागीच ठार झाल्या. त्यांचे पती जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विजय बन्सी खंडागळे यांच्या फिर्यादीवरून देवगाव पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.