पंढरपुरातून दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:41+5:302021-02-05T04:10:41+5:30
जोगेश्वरीतून तरुण बेपत्ता वाळूज महानगर : जोगेश्वरीतून २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ...

पंढरपुरातून दुचाकी लांबविली
जोगेश्वरीतून तरुण बेपत्ता
वाळूज महानगर : जोगेश्वरीतून २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. अनिल संभाजी लिंगायत (२८) हे बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेले आहे. त्यांची पत्नी पूजा लिंगायत यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
त्या कामगाराचा मृत्यू
वाळूज महानगर : कंपनीच्या बाथरुममध्ये बेशुद्ध पडलेल्या ३८ वर्षीय कामगारास शनिवारी (दि.३०) सकाळी ८ वाजता उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गुरुजितसिंग रवींद्रसिंग गुजराल (३८ रा.पंढरपूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. गुरुजितसिंग गुजराल हा शनिवारी (दि.३०) पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास केशरदिप प्रेसिंग (प्लॉट नं.१२) या कंपनीच्या बाथरुममध्ये बेशुद्ध पडलेला मिळून आला होता. त्यास संभाजी शेळके याने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सकाळी ८ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी गुरुजितसिंग गुजराल यास मृत घोषित केले.
पंढरपुरात विजेचा लपंडाव
वाळूज महानगर : पंढरपुरात विजेचा सतत लपंडाव सुरु असल्यामुळे व्यावसायिक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील पोलीस कॉलनी व समोरील कॉम्प्लेक्समधील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रारी करुनही वीजपुरवठा पूर्ववत केला जात नसल्याची ओरड ग्राहकातून केली जात आहे.
वडगाव रस्त्यावर कचऱ्याची विल्हेवाट
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील पाझर तलाव रस्त्यावर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरत आहे. गावातील नागरिक तसेच खासगी गट नंबरमधील उद्योजक या रस्त्यावर केरकचरा आणून टाकतात. या कचऱ्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.