ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: May 24, 2014 02:10 IST2014-05-24T02:00:38+5:302014-05-24T02:10:24+5:30
औरंगाबाद : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोर अचानक ट्रॅक्टर आल्यामुळे दुचाकीस्वाराने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला;
ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
औरंगाबाद : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोर अचानक ट्रॅक्टर आल्यामुळे दुचाकीस्वाराने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण गोंधळलेल्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव आलेला ट्रक धडकला. तो खाली पडला आणि त्याच्या अंगावरून ट्रकचे मागचे चाक गेले. या भीषण अपघातात दुचाकीस्वार मरण पावला. ही घटना बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेज चौकात सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. बाद्रोस अब्दुला चाऊस (६०, रा. अहबाब कॉलनी, रोशनगेट परिसर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते एका शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करत होते. आज सकाळी ते कामावर जाण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच- २०- एके- ९४४१) बसून निघाले होते. ते बीड बायपास रोडवरून कमलनयन बजाज हॉस्पिटलकडे निघाले. एमआयटी कॉलेजजवळ आल्यानंतर समोर एक कोळसा वाहतूक करणारी ट्रक (एमएच- ०५- आर- ७००७) सुसाट निघाली होती. बाद्रोस चाऊस यांना कामावर जाण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी समोरच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला; पण तेवढ्यात समोर एक ट्रॅक्टर चालले होते. त्याला धडकण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बाद्रोस गोंधळून गेले. तेवढ्यात मागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली.