टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 20:45 IST2019-04-04T20:45:30+5:302019-04-04T20:45:43+5:30
भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेदरम्यान बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर घडली.

टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
चितेगाव : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेदरम्यान बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर घडली. दिनकर दौलतराव इंगळे असे मृताचे नाव आहे.
बिडकीन येथील डीएमआयसीतील एल अॅण्ड टी कंपनीत दिनकर इंगळे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. बुधवारी रात्रपाळीची ड्युटी करून ते गुरुवारी सकाळी दुचाकीने (एम.एच.२०-सी एल९७६०) घराकडे निघाले होते. निलजगाव फाट्याहून ते औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्यावर आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने (एम.एच.२० डि.ई ०३७५) दुचाकीला धडक दिली. यात दिनकर इंगळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.