शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

वळण रस्त्यावर भरधाव दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 4:38 PM

Accident at Soyagaon इतर तीन जण जखमी असून त्यांच्यावर पाचोरा (जि जळगाव) येथे उपचार सुरु आहेत. 

ठळक मुद्देदोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला इतर तिघांवर पाचोरा येथे उपचार सुरु आहेत

सोयगाव : सोयगाव- चाळीसगाव मार्गावर बनोटी (ता.सोयगाव) जवळील वळणावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात इतर तीन जण जखमी असून त्यांच्यावर पाचोरा (जि जळगाव) येथे उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शेवरी (ता. चाळीसगाव) येथील  चंद्रकात बद्री फणशे (३५) हे पत्नी अरुणा (३०) आणि मुलगा कार्तिक (५) यांच्यासह दुचाकीवरून ( एमएच १९एएस ०६४७ ) बनोटी येथील नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी येत होते. तर बनोटी येथील बन्सी हरचंद चौधरी (४०) आणि संदीप चंपालाल चौधरी (३२) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १९ एके ०७०१) नागदकडे कामानिमित्त जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास बनोटी गावापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर वेगात असणाऱ्या दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या.  

अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. अपघाताचा जोरात आवाज झाल्याने आसपासचे शेतकरी तसेच काही ग्रामस्थांनी घानास्थाली धाव घेतली. उपसरपंच सागर खैरनार, स्वप्नील सोनवणे यांनी बनोटी येथील काही युवकांच्या मदतीने जखमी पाचही जणांना बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पाचोरा (जि जळगाव) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे बन्सी हरचंद चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पाच वर्षीय कार्तिकचा जळगाव येथील खाजगी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. अपघातात जखमी इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली बनोटी पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल सुभाष पवार, विकास दुबेले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे..

रस्त्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढल्याने अपघातात वाढराज्य रस्ता क्रं.२४ सोयगाव- चाळीसगाव रस्त्याच्या दुर्तफा गवत आणि झुडपांची मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे बनोटी जवळील वळण रत्यावर समोरुन येणार्‍या वाहनांचा अंदाज चालकांना येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी बहुलखेडा गावाजवळ अशाच अपघातात एका जणाला प्राण गमवावे लागले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद