चोरीची दोन वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 18:48 IST2019-01-23T18:48:28+5:302019-01-23T18:48:44+5:30
अल्पवयीन मुलाला (विधिसंघर्षग्रस्त बालक) चोरीचे वाहन वापरताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. ही कारवाई २० जानेवारी रोजी हर्सूल टी पॉइंट परिसरात केली. त्याच्याकडून दोन वाहने जप्त करण्यात आली.

चोरीची दोन वाहने जप्त
औरंगाबाद : अल्पवयीन मुलाला (विधिसंघर्षग्रस्त बालक) चोरीचे वाहन वापरताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. ही कारवाई २० जानेवारी रोजी हर्सूल टी पॉइंट परिसरात केली. त्याच्याकडून दोन वाहने जप्त करण्यात आली.
अधिक चौकशीअंती त्याने त्याच्याकडील मोटारसायकल जाधववाडी येथील देवगिरी अपार्टमेंट परिसरातून, तर अन्य एक मोपेड समर्थनगर भागातून चोरल्याचे सांगितले. दोन्ही वाहने जप्त क रण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, कर्मचारी शेख नजीर, तुकाराम राठोड, संदीप क्षीरसागर, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर ठाकूर, प्रमोद चव्हाण आणि वाहनचालक पवार यांनी केली.