शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मागची काच निखाळल्याने धावत्या स्कूल बसमधून पडून दोन विद्यार्थी गंभीर जखमी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 20:18 IST

बसमधून दोन विद्यार्थी पडल्याचे चालकाच्या आणि शिक्षकांच्या लक्षात न आल्याने बसचालक सुसाट पुढे जात होता.

औरंगाबाद: जनावराप्रमाणे १२२ विद्यार्थ्यांना बसमध्ये कोंबून त्यांना पंढरपुर येथे घेऊन जाणाऱ्या  धावत्या बसची मागील काच अचानक निखळल्याने बसमधील दोन विद्यार्थी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे बसमधून विद्यार्थी पडल्याचे बसचालकाला न समजल्याने तो सुसाट पुढे जात होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी आरडओरड करून बस थांबविली. त्यानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात दुपारी तीन वाजेच्या सुमारास नगर नाक्याजवळ घडला. 

तेजस संजय घोंगडे (वय ८ रा. रांजणगाव श्ो.) आणि सम्राट सुरेंद्र अभंग (वय ७)अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कुलमध्ये आज गोवर-रुबेला लसीकरण होते. या संस्थेची दुसरी शाळा रांजणगाव शेणपुंजी येथे आहे. तेथील शाळेतील सुमारे १२२ विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी आज सकाळी एक बस आणि टेम्पो ट्रॅव्हल्समधून  शहरातील खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कुलमध्ये आणण्यात आले होते.  वाळूज येथील शांताई शाळेची बस विद्यार्थ्यांना नेण्यासाठी बोलविण्यात आली होती. 

दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास लसीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर शांताई शाळेच्या  बसमध्ये (क्रमांक एमएच-२० डब्ल्यू ९७५०) सर्वच्या सर्व १२२ विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले आणि एम.के. राठोड, एम.सी.सुरनार या शिक्षकांना बसमध्ये बसविण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन बस शिवाजी हायस्कुल येथून  पंढरपुरकडे निघाली. बसमधील विद्यार्थी गर्दीमुळे गुदमरून गेले होते.  छावणीतील लोखंडी पुल ते नगर नाका दरम्यान बस असताना बसची मागील काच अचानक निखळली आणि मागील सिटावर बसलेला तेजस आणि सम्राट हे दोन विद्यार्थी  सुसाट बसमधून खाली रस्त्यावर पडले. यामुळे बसमधील विद्यार्थ्यांनी प्रचंड आरडाओरड केली.  

३०० मीटर पाठलाग करून प्रत्यक्षदर्शींनी रोखली बसबसमधून दोन विद्यार्थी पडल्याचे चालकाच्या आणि शिक्षकांच्या लक्षात न आल्याने बसचालक सुसाट पुढे जात होता. मात्र प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहताच घटनास्थळापासून सुमारे ३०० मीटरपर्यंत पाठलाग करून बस थांबविली. काही जणांनी त्यांची वाहने बाजूला घेत जखमी विद्यार्थ्यांना उचलून बाजुला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद