विमान आणि रेल्वेतून आलेले प्रत्येकी दोन प्रवासी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 15:59 IST2020-11-26T15:59:05+5:302020-11-26T15:59:23+5:30

सचखंड एक्स्प्रेसमधून आलेल्या प्रवाशांमधूनही दोन जण बाधित

Two passengers each from the plane and the train were positive | विमान आणि रेल्वेतून आलेले प्रत्येकी दोन प्रवासी पॉझिटिव्ह

विमान आणि रेल्वेतून आलेले प्रत्येकी दोन प्रवासी पॉझिटिव्ह

औरंगाबाद : राज्यातून विमान आणि रेल्वेने औरंगाबादेत मंगळवारी विमानाने आलेल्या २६ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील २ प्रवासी बाधित आढळले, तर सचखंड एक्स्प्रेसमधून आलेल्या प्रवाशांमधूनही दोन जण बाधित निघाले. 

मंगळवारपासून विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी २६ प्रवाशांचे स्वॅब घेण्यात आले. याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. दिल्लीहून आलेले २ प्रवासी  पॉझिटिव्ह आढळले. सचखंड एक्स्प्रेसने मंगळवारी आलेल्या १६८ प्रवाशांचे स्वॅब घेण्यात आले होते.  मनपा पथकाने बुधवारी सचखंड रेल्वेने उतरलेल्या २३८ व विमानाने आलेल्या ७९ प्रवाशांचेही स्वॅब घेतले. 
 

Web Title: Two passengers each from the plane and the train were positive