दोन मोबाईल चोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 21:13 IST2019-03-01T21:12:54+5:302019-03-01T21:13:04+5:30

मोबाईल चोरी करून ते विक्रीसाठी आलेल्या चोरट्याच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वेस्टेशन पुलाजवळ गुरुवारी अटक केली.

Two mobile thieves detained | दोन मोबाईल चोर अटकेत

दोन मोबाईल चोर अटकेत

औरंगाबाद : मोबाईल चोरी करून ते विक्रीसाठी आलेल्या चोरट्याच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वेस्टेशन पुलाजवळ गुरुवारी अटक केली. याप्रकरणी वेदांतनगर, तसेच उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे उघड झाल्याने चोरट्यांना वेदांंतनगर पोलिसांच्या हवाली केले आहे.


दोन मोबाईल चोरटे राजीवनगरजवळील रेल्वे फाटकाच्या उड्डाणपुलाजवळ चोरलेले मोबाईल फोन विक्रीच्या उद्देशाने येणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने याठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय पवार यांनी सापळा लावला होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीतील वर्णनाप्रमाणे सय्यद सादिक सय्यद मंजूरअली (२२, रा. सादातनगर, गल्ली नं. ३), रणजित ऊर्फ थारो प्रेमचंद गोठवाल (२०, रा. राहुलनगर, गल्ली नं. ३) हे दोघे जण दुचाकीवर (एमएच-२१-डब्ल्यू-०५५८ ) राजीवनगर उड्डाणपुलाखाली आले. पोलिसांनी त्यांना लागलीच ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ ४ मोबाईल फोन आढळून आले. या मोबाईलविषयी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारले असता मोटारसायकलवरून वेगाने जात नागरिकांचे मोबाईल हिसकावून घेतल्याची कबुली दिली.


या चोरट्यांनी वेदांतनगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांना पकडल्याने मोबाईल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या पथकाने व्यक्त केली आहे. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

 

Web Title: Two mobile thieves detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.