दोन तासांच्या एकपात्री नाट्याविष्काराने सदस्य झाले मंत्रमुग्ध

By Admin | Updated: July 15, 2014 00:48 IST2014-07-15T00:21:05+5:302014-07-15T00:48:08+5:30

परभणी : एका अभिनेत्याच्या दोन किंवा तीन भूमिका आपण नेहमीच चित्रपटातून पाहतो़ परंतु, परभणीत सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकातून संपूर्ण वऱ्हाडाचीच भूमिका सादर करीत

Two-hour solo monologue became part of the theater | दोन तासांच्या एकपात्री नाट्याविष्काराने सदस्य झाले मंत्रमुग्ध

दोन तासांच्या एकपात्री नाट्याविष्काराने सदस्य झाले मंत्रमुग्ध

परभणी : एका अभिनेत्याच्या दोन किंवा तीन भूमिका आपण नेहमीच चित्रपटातून पाहतो़ परंतु, परभणीत सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकातून संपूर्ण वऱ्हाडाचीच भूमिका सादर करीत उपस्थित सदस्यांना मंत्रमुग्ध केले़
सखीमंच आणि बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी लोकमतने १३ जुलै रोजी वऱ्हाड निघालं लंडनला या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते़ सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी हा प्रयोग महिला प्रेक्षकांसमोर सादर केला़ वेगवेगळ्या भूमिका बखुबीने निभवत पाठक यांनी सदस्यांना खिळवत ठेवले़ दोन तासांच्या या प्रयोगात अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत दाद दिली़ या कार्यक्रमास सखीमंच आणि बाल विकास मंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते़ प्रायोजक श्री साई बेन्टेक्स ज्वेलरीचे बालासाहेब घिके, मंगलाताई घिके यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ या प्रसंगी निताताई देशमुख, डॉ़ संजय टाकळकर, डॉ. समप्रिया पाटील, कलाकार संदीप पाठक यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती़ याच कार्यक्रमामध्ये साई बेन्टेक्सचा लकी ड्रॉ काढण्यात आला़ यात किर्ती लाटकर, वर्षा वैष्णव, पल्लवी लोलगे या सखींना गिफ्ट देण्यात आले़ या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा जोशी यांनी केले़ कार्यक्रमासाठी सविता अग्रवाल, संगीता जामगे, वंदना पवार, लता वाजपेयी यांनी सहकार्य केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Two-hour solo monologue became part of the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.