विभागीय पथकाकडून दोन ग्रामपंचायतींची तपासणी
By Admin | Updated: July 22, 2014 00:15 IST2014-07-22T00:11:43+5:302014-07-22T00:15:00+5:30
बीड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय पातळीवरील समितीने जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींची तपासणी केली. त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

विभागीय पथकाकडून दोन ग्रामपंचायतींची तपासणी
बीड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय पातळीवरील समितीने जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींची तपासणी केली. त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
उपायुक्त (विकास) अनिलकुमार लव्हाळे यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांची समिती रविवारी जिल्ह्यात दाखल झाली. पहिल्या दिवशी आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव ग्रामपंचायतची तपासणी करण्यात आली तर सोमवारी अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे समितीने पाहणी केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासाठी या दोन ग्रामपंचायतील जिल्हास्तरावर पात्र ठरल्या होत्या. ही समिती आपला अहवाल आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांना सादर करणार आहे. त्यानंतर २५ जुलै रोजी आयुक्त विभागीयस्तरावर पात्र ग्रामपंचायतींची घोषणा करणार आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही तपासणी सुरू आहे. तपासणी समितीसोबत पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नैमोद्दीन कुरेशी, चंद्रकांत पांडव, उद्धव नांदूरकर आदी होते. (प्रतिनिधी)
अशी केली तपासणी
पथकाने सनगाव, कऱ्हेवडगाव येथील दलितवस्ती, अंगणवाडी, स्वच्छतागृह, महिला, बाल आरोग्य आदींचा आढावा घेतला.