शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शेतीची कामे करत असताना दोन शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवला; छ. संभाजीनगर जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:06 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर: पेरणी झाल्यानंतर वखरणीसह इतर कामांमध्ये शेतकरी गुंतलेला आहे. यातच जिल्ह्यातील आंबेवाडी आणि खंडाळा येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार आणि सोमवारी घडली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आंबेवाडी शिवारात विद्युत धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यूगंगापूर : विद्युत धक्का लागून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शहराजवळ पालिका हद्दितील आंबेवाडी शिवारात सोमवारी (दि.३०) सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. अशोक पंढरीनाथ गव्हाणे (वय ४५, रा.आंबेवाडी) असे विद्युत धक्का लागून मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी अशोक गव्हाणे हे सोमवारी दुपारी आपल्या शेतात वखरणी करीत होते. याच वेळी त्यांच्या उसाला पाणीही चालू होते. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास मोटर बंद पडल्याने ते पाहण्यासाठी गेले असता, विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाच्या तानाला स्पर्श होऊन त्यांना जोराचा विजेचा धक्का बसून ते जागेवरच कोसळले. बराच वेळ त्यांचा वखर बैलासह उभा असल्याने शेजारी व कुटुंबियांनी तेथे जाऊन पाहिले असता, ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी येथील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, असा परिवार आहे.

मुलगा दिंडीत अन् इकडे कुटुंबावर शोककळा...अशोक गव्हाणे यांचे कुटुंबीय वारकरी आहे. यंदा त्यांचा लहान मुलगा आणि भाऊ हे आळंदीच्या दिंडीत सहभागी झाले होते. मात्र, अशोक यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्या दोघांना दिंडीतून माघारी परतावे लागले.

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यूवैजापूर: तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अरुण जगन्नाथ सोनवणे (वय ५५ वर्षे) असे मयताचे नाव आहे. खंडाळा येथील गट नंबर ६१३ मधील विहिरीवर अरुण सोनवणे हे विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजना