नकली नोटा छापणारे दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 01:22 IST2015-07-28T01:00:32+5:302015-07-28T01:22:24+5:30

औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी घरच्या घरीच बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या एका विधिसंघर्षग्रस्त मुलासह दोन जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

Two fake detectives arrested | नकली नोटा छापणारे दोन अटकेत

नकली नोटा छापणारे दोन अटकेत


औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी घरच्या घरीच बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या एका विधिसंघर्षग्रस्त मुलासह दोन जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी अटक केली. वर्षभरापासून आरोपी आवश्यक तेवढ्या नोटा छापून चलनात आणत होते. त्यांच्याकडून २० हजार रुपयांच्या बनावट नोटा, कलर प्रिंटर आणि चोरीच्या महागड्या ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सिडको एन-२ भागातील महालक्ष्मी चौकात करण्यात आली.
शेख अमीर (२०) आणि सागर उर्फ बंटी( १८) यांचा चा समावेश आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको एन-२ भागातील महालक्ष्मी चौकात भाड्याने घर घेऊन शेख अमीर, त्याचा मित्र सागर आणि १७ वर्षीय युवती राहत होते. हे दोघे युवक सतत वेगवेगळ्या कंपन्यांच्या महागड्या मोटारसायकली वापरत असत. त्यामुळे ते चोरीच्या मोटारसायकली वापरत असावेत, अशी माहिती मुकुंदवाडी ठाण्यातील सहायक फौजदार कल्याण शेळके,

Web Title: Two fake detectives arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.