ट्रक-बाईकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर ट्रकचालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 08:00 IST2017-10-26T07:56:49+5:302017-10-26T08:00:18+5:30
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपानी फाटा (औरंगाबाद ) शिवारात भरधाव ट्रकची समोरुन येणा-या बाईकला जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की बाईकवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक-बाईकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर ट्रकचालक फरार
औरंगाबाद : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपानी फाटा (औरंगाबाद ) शिवारात भरधाव ट्रकची समोरुन येणा-या बाईकला जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की बाईकवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी ( 25 ऑक्टोबर ) राञी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, निपानी फाट्यावर अपघात होऊन गेल्या 15 दिवसांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
रणजित गोविंद राठोड (वय 27 वर्ष) आणि पिराजी आढे (वय 30 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. रणजित राठोड हा आंबेडकर नगर येथील रहिवासी होता तर पिराजी आढे अंबडमध्ये राहणारा होता. हे दोघंही औरंगाबादहून आडूळकडे जात होते. त्यावेळी बीडच्या दिशेनं औरंगाबादकडे जाणार्या भरधाव ट्रक या दोघांच्या बाईकला धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरच ट्रक सोडून तो पसार झाला आहे. या अपघाताप्रकरणी चिकलठाणा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.