दोन दिवसांनंतर वाळूजचा पाणीपुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:25 IST2018-11-04T17:25:12+5:302018-11-04T17:25:28+5:30
वाळूज महानगर: मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाळूज उद्योगनगरीसह नागरी वसाहती पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारी या भागाचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने उद्योजक व नागरिकांचा जिव भांड्यात पडला आहे.

दोन दिवसांनंतर वाळूजचा पाणीपुरवठा पूर्ववत
वाळूज महानगर: मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाळूज उद्योगनगरीसह नागरी वसाहती पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारी या भागाचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने उद्योजक व नागरिकांचा जिव भांड्यात पडला आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील नागरी वसाहतींना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. शुक्रवारी ब्रम्हगव्हाण येथील पाणी उपसा केंद्राजवळ मुख्य जवाहिनी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा बंद झाला.
दोन दिवसांपासून उद्योगांसह नागरी वसाहतीत पाण्याची बोंब सुरु असल्याने उद्योजक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. बहुतांश उद्योगांनी जमा करुन ठेवलेल्या पाण्यावर एक दिवस धकविला. मात्र, दुसऱ्या दिवशी चांगलीच तारांबळ उडाली. उद्योजकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागल्याने आर्थिक झळ सोसावी लागली. तसेच अनेक गावांतील रहिवाशांचेही हाल झाले. अखेर दोन दिवसांनंतर एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरु केला.
एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता दिलीप परळीकर म्हणाले की, फुटलेल्या जलवाहिनी दुुरुस्ती करण्यात आली आहे. वाळूज एमआयडीसीतील नागरी वसाहतीसह उद्योगांचा पाणीपुरवठा सुरु केला आहे. लेव्हल भरण्याचे काम सुरु आहे. सायंकाळपर्यंत चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरु होईल, असे ते म्हणाले.