औरंगाबादेत दोन बाधीतांचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या १६४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 14:14 IST2020-06-17T14:13:49+5:302020-06-17T14:14:43+5:30

७५ वर्षीय व ६० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Two corona patients deaths in Aurangabad; The number of corona deaths is 164 | औरंगाबादेत दोन बाधीतांचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या १६४ वर

औरंगाबादेत दोन बाधीतांचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या १६४ वर

औरंगाबाद : शहरात घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दोन कोरोनाबाधितांनी अखेरचा श्वास घेतला. यात भोकरदन (जि. जालना) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १६४ झाली आहे.

बायजीपुरा येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णास ९ जून रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. १० जून रोजी सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी ८ वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. तर भोकरदन येथील ६० वर्षीय रूग्ण १२ जून रोजी घाटीत दाखल झाला होता. या रुग्णाचा १३ जून रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.
 

Web Title: Two corona patients deaths in Aurangabad; The number of corona deaths is 164