शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पडेगावात दोन भावांना चाकूने भोसकले!

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

औरंगाबाद : गल्लीत उभे राहून अश्लील शिवीगाळ का करता, असा जाब विचारणाऱ्या दोन भावांना दोन जणांनी चाकूने भोसकल्याची घटना शनिवारी दुपारी पडेगाव परिसरातील प्रिया कॉलनीत घडली.

औरंगाबाद : गल्लीत उभे राहून अश्लील शिवीगाळ का करता, असा जाब विचारणाऱ्या दोन भावांना दोन जणांनी चाकूने भोसकल्याची घटना शनिवारी दुपारी पडेगाव परिसरातील प्रिया कॉलनीत घडली.भोसकलेल्या शेख सिराज शेर रफिक (२२) व शेख हारुण शेख रफिक (२५, रा. प्रिया कॉलनी) यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. यावेळी नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झटापटीत आरोपींची दुचाकी, मोबाईलसह चाकू घटनास्थळीच पडला. ते सोडून आरोपी पसार झाले.घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास प्रिया कॉलनीत मोटारसायलकवर आले. शेख सिराज यांच्या गल्लीतच राहणाऱ्या एका महिलेशी पैशाच्या देवाण-घेवाणीवरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. दोन्ही आरोपी त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करू लागले. हा गोंधळ सुरू असताना शेख सिराज व शेख हारुण हे दोघे घरातून बाहेर आले आणि ‘येथे महिला राहतात. तुम्ही अश्लील शिवीगाळ का करता?’ असा जाब विचारला. तेव्हा आरोपींनी त्या महिलेला शिवीगाळ करणे सोडले आणि चाकू काढून शेख सिराज व त्याचा भाऊ शेख हारुण या दोघांवर चाकूने सपासप वार केले. त्यावेळी आरडाओरड झाल्यानंतर आसपासचे नागरिक धाऊन आले. आरोपींना पकडण्याच्या प्रयत्नात झटापट झाली. तेव्हा आपली दुचाकी, चाकू व मोबाईल सोडून आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर जखमी शेख सिराज व शेख हारुण यांना उपचारासाठी तातडीने घाटीत पाठविण्यात आले. इकडे रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिसांनी या घटनेचा गुन्हाच नोंदविला नव्हता. किरकोळ घटना आहे, असे सांगून पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करताना दिसून आले.