दुष्काळी परिस्थितीत दुग्ध व्यवसाय अडचणीत
By Admin | Updated: August 25, 2014 23:48 IST2014-08-25T23:48:45+5:302014-08-25T23:48:45+5:30
गढी : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अद्यापही अपेक्षेप्रमाणे वरूण राजाने हजेरी लावलेली नाही.

दुष्काळी परिस्थितीत दुग्ध व्यवसाय अडचणीत
गढी : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अद्यापही अपेक्षेप्रमाणे वरूण राजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे हिरवा चारा मिळणे अशक्य झाले आहे. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होत असल्याचे चित्र गढी परिसरात दिसून येत आहे.
या वर्षी जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. गढी परिसरातही या वर्षी पावसाने दडी मारली. पाऊस नसल्यामुळे हिरवा चारा उपलब्ध झाला नाही. शेतीच्या कडेला असलेल्या बांधावरही अद्याप वाळलेलेच गवत आहे.
प्रत्येक वर्षी या दरम्यान प्रत्येक बांधावर हिरवा चारा दिसून येत असतो. मात्र यावर्षी असा कुठलाही प्रभाव दिसून आला नाही. हिरवा चारा मिळत नसल्याने शेतकरी आपल्याकडे असलेल्या गायी, म्हशी, शेळी आदी पशुधन बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
दुग्ध व्यवसाय करण्याकडे अगोदरच शेतकऱ्यांचा कमी कल आहे. शासनाकडून दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी या व्यवसायाकडे पाठ फिरवू लागला आहे. गढी परिसरात पूर्वी मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसाय केला जात होता. त्यावेळेस जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होता व योग्य हमी भावही मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती बरोबरच दुधाचा व्यवसाय जोडला होता.
बाजारामध्ये येणाऱ्या हिरव्या चाऱ्याचे भावही गगणाला भिडले आहे. मका, गवत, घास आदी प्रकारचा चारा महागला आहे. मक्याची एक पेंडी वीस ते तीस रुपयांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.
या वर्षी शासनाकडूनही दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करणे सोडून दिले आहे. त्यातच पावसानेही दडी मारली आहे.
पाऊस कमी झाल्याने हिरव्या चाऱ्याची भासते टंचाई.
४शासनाकडूनही मिळत नाही दुधाला योग्य भाव.
४हिरव्या चाऱ्याचे भाव कडाडले आहेत.
४शेतकऱ्यांनी गाय, म्हैस, शेळी हे पशुधन विक्रीसाठी आणले बाजारात.
४हिरवा चारा उपलब्ध करून देण्याची होतेय मागणी.
४दुग्ध व्यवसाय करणारे आले अडचणीत.
४शेतकरी करू लागला पावसाची प्रतीक्षा.