विद्युतवाहिनीला ट्रकचा स्पर्श; चालकाने कॅबीनबाहेर उडी घेतली, पण रस्त्यावर पडून जीव गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 12:07 IST2023-07-12T12:03:35+5:302023-07-12T12:07:10+5:30
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील घटना

विद्युतवाहिनीला ट्रकचा स्पर्श; चालकाने कॅबीनबाहेर उडी घेतली, पण रस्त्यावर पडून जीव गेला
- नितीन कांबळे
कडा: भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जीव वाचवण्यासाठी कॅबीनबाहेर उडी घेतलेल्या चालकाचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाला. भागवत गेणा धोंडे (३८, रा.कर्जत) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना आज पहाटे दोन वाजेच्या दरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, भंगार वाहतूक करणारा ट्रक ( MH. १२,EQ १४७९ ) बीड- नगर राष्ट्रीय महामार्गावर आष्टीयेथून अहमदनगरकडे जात होता. कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्याने ट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरला. यामुळे चालक भागवत धोंडे याने जीव वाचवण्यासाठी कॅबीनमधून खाली उडी घेतली. मात्र, चालक भागवत रस्त्यावरपडून डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.