गोलटगाव फाट्यावर ट्रक उलटला, चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 21:48 IST2019-05-26T21:48:16+5:302019-05-26T21:48:29+5:30
करमाड : जालन्याहून- औरंगाबादकडे जाणारा भरधाव ट्रक पलटी होऊन चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना गोलटगाव फाट्यावर रविवारी दुपारी ...

गोलटगाव फाट्यावर ट्रक उलटला, चालक जखमी
करमाड : जालन्याहून-औरंगाबादकडे जाणारा भरधाव ट्रक पलटी होऊन चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना गोलटगाव फाट्यावर रविवारी दुपारी तीन वाजता घडली.
ट्रक ( एम. एच.०४-जीआर३३७०) हा जालन्याहून औरंगाबादकडे चालला होता. यावेळी गोलटगाव फाट्याजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रोडवर पलटी झाला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकबाहेर उडी घेतली. त्यामुळे तो किरकोळ जखमी झाला.
त्यानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, जमादार रमेश धस, नागनाथ केंद्रे यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या साह्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.