ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकची बाईकला धडक; एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 19:25 IST2019-01-12T19:25:15+5:302019-01-12T19:25:55+5:30
सागर मच्चीन्द्र निकम असे मृताचे नाव असून यात पवन बाळू निकम हा गंभीर जखमी आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकची बाईकला धडक; एकजण जागीच ठार
गल्ले बोरगांव (औरंगाबाद ) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने बाईकला जोरदार धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी पळसवाडी येथील वळण रस्त्यावर घडली. सागर मच्चीन्द्र निकम असे मृताचे नाव असून यात पवन बाळू निकम हा गंभीर जखमी आहे.
सागर मच्चीन्द्र निकम ( २२, रा.गव्हळी ता.कन्नड) व पवन बाळू निकम (२३) हे दोघे एकाच बाईकवर (महा २० डिबी ८०७९) खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी गेले होते. परत येताना पळसवाडी येथील वळण रस्त्यावर खुलताबाद कडुन कन्नड कडे जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅकने ( महा ४५ ई ७७७० ) त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. यात सागर जागीच ठार झाला तर पवन गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पो.ना.विजय गायकवाड, जे.पी.बली, दीपेश शिरोडकर, युवराज पाटील, रामसिंग कुचे, सुधाकर दहिवाल, अशोक मोकळे, गौतम भालेराव, धिरज वाकळे, नामदेव ठेंगडे, विनोद ठेंगडे, संतोष ठेंगडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला मदत करत वाहतूक सुरळीत केली.