पैठण रोडवर भरधाव ट्रकने डॉक्टर तरुणीस चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 15:57 IST2018-08-16T15:54:25+5:302018-08-16T15:57:23+5:30
पैठण रोडवरील मा-बाप दर्गाजवळ भरधाव ट्रकने मोपेडस्वार तरुणीस चिरडले.

पैठण रोडवर भरधाव ट्रकने डॉक्टर तरुणीस चिरडले
औरंगाबाद : पैठण रोडवरील मा-बाप दर्गाजवळ आज सकाळी भरधाव ट्रकने मोपेडस्वार महिलेला चिरडले. सारीका महेश तांदळे (३०, रा. समर्थ गार्डन) असे मृत तरुणीचे नाव आहे. मयत सारिका कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद कॉलेज येथे एमडी दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती.
आज सकाळी सारिका मोपेडने कॉलेजला जात असतांना ट्रकने त्यांना चिरडले. यानंतर ट्रक घटनास्थळाजवळ नव्हता. अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह घाटीत हलविला. सारिका हिचे पती बदनापूर येथे एका मेडीकल कॉलेजमध्ये स्त्रीरोग विभागात प्राध्यापक असून त्यांचे समर्थनगर येथे हॉस्पिटल आहे.