ट्रक चालकाची क्रूर हत्या करून टुलबॉक्समध्ये लपवला मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने आले उघडकीस

By सुमित डोळे | Updated: January 22, 2025 16:36 IST2025-01-22T16:34:28+5:302025-01-22T16:36:23+5:30

अहिल्यानगरच्या ट्रक चालकाचा छत्रपती संभाजीनगरात आढळला मृतदेह

Truck driver brutally murdered, body hidden in toolbox; The incident was revealed after a foul smell was released | ट्रक चालकाची क्रूर हत्या करून टुलबॉक्समध्ये लपवला मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने आले उघडकीस

ट्रक चालकाची क्रूर हत्या करून टुलबॉक्समध्ये लपवला मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने आले उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर येथील केडगावमधील ट्रक चालक-मालक असलेले विजय मुरलीधर राऊत (५२) यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरलगत जाणाऱ्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील झाल्टा परिसरातील उभ्या ट्रकमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता चालकाच्या सीट मागील टुलबॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळून आला. आज, बुधवारी पहाटे ५ वाजता ही घटना उघडकीस आली. 

मागील तीस वर्षांपासून राऊत ट्रक व्यवसायात आहेत. चालक ठेवण्याऐवजी ते स्वत:च ट्रक चालवून मालाची नेआण करत. सहा दिवसांपूर्वी ते मध्यप्रदेशच्या रायपुर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये माल पोहोचवण्यासाठी एकटेच गेले होते. तेथून त्यांना अहिल्यानगरसाठी लोखंडी सळ्या पोहोचवण्याचे कंत्राट मिळाले. त्यामुळे रविवारी ते तेथून माल घेऊन निघाले. मंगळवारी मध्यरात्री मात्र त्यांच्या संघटनेच्या एका ट्रक चालकाला राऊत यांचा ट्रक (एम एच १७ - बीडी - ५१६६) छत्रपती संभाजीनगरलगत जाणाऱ्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील झाल्टा परिसरात उभा दिसला. त्याने गावाकडील अन्य संघटनेच्या सदस्यांना तत्काळ ही बाब कळवली. संघटनेच्या सदस्यांनी शहरातील काही ट्रक व्यवसायिकांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. ते मध्यरात्री २ वाजता आडगाव परिसरात पोहोचले. ट्रकमधून मात्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. चालकाच्या कॅबिनमधूनच दुर्गंधी येत असल्याने त्यांनी टुलबॉक्स उघडला. तेव्हा टुलबॉक्समध्ये राऊत यांच्या चेहऱ्यावर क्रुर पध्दतीने वार करुन हत्या केलेला फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढल्याने सर्वांना धक्काच बसला.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव, संशयितांची चौकशी सुरू 
राऊत यांची हत्या नेमकी कुठे झाली, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मारेकऱ्याने त्यांची दुसरीकडे हत्या केली असावी. त्यानंतर टुलबॉक्समध्ये मृतदेह लपवून ट्रक झाल्टा परिसरात आणून उभा केल्याचा दाट संशय आहे. जिल्ह्याचे उपअधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतिष वाघ, चिकलठाण्याचे उपनिरीक्षक सतिष पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दुपारपर्यंत घाटी रुग्णालयात राऊत यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते.

Web Title: Truck driver brutally murdered, body hidden in toolbox; The incident was revealed after a foul smell was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.