शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ कासवाची तस्करी करणारे त्रिकूट गजाआड

By admin | Updated: November 6, 2014 01:38 IST

औरंगाबाद : दुर्मिळ कासवाची तस्करी करणाऱ्या तिघांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून एका कासवासह कारही जप्त करण्यात आली.

औरंगाबाद : दुर्मिळ कासवाची तस्करी करणाऱ्या तिघांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून एका कासवासह कारही जप्त करण्यात आली. या कासवाची आंतरराष्ट्रीय बाजारात ४० लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे. कारवाईबाबत पोलीस निरीक्षक व्ही. एच. हाश्मी यांनी सांगितले, काही जण दुर्मिळ जातीचे कासव विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्या माहितीवरून उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिराजवळ सापळा रचण्यात आला. काही वेळातच खबऱ्याने सांगितलेल्या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार थांबली, त्यात कासव घेऊन आरोपी नाशिकला जाण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकून आरोपींना पकडले. गोल्डन ब्राऊन रंगाच्या व गुळगुळीत टणक टवकी असलेल्या या कासवाची विक्रीतून ४० लाख रुपये किंमत येणार होती. हे कासव कुठून आणि कोणी आणले हे पळून गेलेल्या आरोपींनाच माहिती असल्याने फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात येत नाही, तोपर्यंत सत्यता पुढे येणे शक्य नाही.४ अटक केलेल्या आरोपींचा या कासवात पाच जण मिळून ५० टक्के हिस्सा होता; परंतु तिघेही तोंड उघडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांशी या टोळीचे संबंध आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. ४आरोपींविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात वन्यजीवांच्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.