शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

किलीमांजरो शिखरावर फडकावला तिरंगा; औरंगाबादच्या अंबादासने प्रजासत्ताकदिनी रचला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:34 PM

Kilimanjaro अंबादास गायकवाड व अतुल वसावे हे १९ जानेवारी रोजी किलीमांजरो शिखर मोहिमेसाठी रवाना झाले होते.

ठळक मुद्देकिलीमांजारो हे आफ्रिकेतील टान्झानिया देशातील शिखर आहेत्याची उंची समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे.

औरंगाबाद : प्रतिकूल वातावरण, घोंगावत जाणारे वारे, खडतर चढ आणि पडणारा बर्फ.. या खडतर परिस्थितीवर यशस्वी मात करीत औरंगाबादच्या अंबादास गायकवाड आणि नंदुरबार येथील अतुल वसावे यांनी मंगळवारी प्रजासत्ताकदिनी इतिहास रचताना आफ्रिकेतील सर्वोच्च उंचीवरील शिखर किलीमांजरो सर करीत तेथे तिरंगा फडकावण्याचा विक्रम केला.

अंबादास गायकवाड व अतुल वसावे हे १९ जानेवारी रोजी किलीमांजरो शिखर मोहिमेसाठी रवाना झाले होते. या दोघांनी अतिशय खडतर परिस्थितीवर मात करीत २६ जानेवारी रोजी सकाळी सव्वाअकरा वाजता किलीमांजरो शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकावला. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांचा प्रचार जगभर होणार आहे, असे त्याचे प्रशिक्षक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले. किलीमांजारो हे आफ्रिकेतील टान्झानिया देशातील शिखर असून, त्याची उंची समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे. या मोहिमेसाठी अंबादास गायकवाडने अनेक वर्षे खडतर सराव केला. त्याने याआधी लेहमधील कांगरी शिखर मोहीमही फत्ते केली आहे. तसेच गिर्यारोहणाचे शास्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. आगामी काळात अंबादासचे युरोप आणि आस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करण्याचे लक्ष्य आहे. अंबादास गायकवाड ३६० एक्सप्लोअर ग्रुपद्वारे आयोजित या माेहिमेत किलीमांजरो शिखर मोहिमेत सहभागी झाला होता.

अशी कामगिरी करणारा एमआयडीसीचा पहिला कर्मचारीअंबादास गायकवाड हा औरंगाबाद येथे एमआयडीसीत सेवेत असून, अवघ्या १६ वर्षांचे असताना वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याने अतिशय संघर्षपूर्ण परिस्थितीवर मात करीत आपली गिर्यारोहणाची आवड जपली आहे. किलीमांजरो शिखर मोहीम फत्ते करणारा तो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पहिला कर्मचारी आहे. विशेष म्हणजे कर्ज काढून त्याने ही मोहीम फत्ते केली. याआधी औरंगाबादची एव्हरेस्ट शिखर मोहीम फत्ते करणारी मनीषा वाघमारे हिनेही किलीमांजरो शिखर सर केले आहे.

युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करणार प्रजासत्ताकदिनी किलीमांजरो शिखरावर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही आतुर होतो. अतिशय प्रतिकूल वातावरणात आम्ही ही मोहीम फत्ते केली याचा अभिमान वाटत आहे. आगामी काळात युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करण्याचे लक्ष्य आहे.- अंबादास गायकवाड, गिर्यारोहक, औरंगाबाद

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनAurangabadऔरंगाबाद