शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By admin | Updated: June 5, 2014 00:14 IST

हिंगोली : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्धल मंगळवारी जिल्हाभरात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हिंगोली : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्धल मंगळवारी जिल्हाभरात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. काही ठिकाणी बंदही पाळण्यात आला. समाजवादी पार्टी हिंगोलीत समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शेख नईम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रविकुमार जयस्वाल, तौफिक अहेमद खान, खंडेराव बेंगाळ, शेख बासीत, उत्तम नागरे, शेख नफीस पहेलवान, सय्यद रोशन, पठाण आलमखान, सय्यद शोएब, शेख आवेज, शेख हमीद, पठाण रऊपखान, शंकरअण्णा राटनालु, शेख तौफीक अहेमद मजीदखान आदी उपस्थित होते. पीपल्स बँकेत श्रद्धांजली हिंगोली शहरातील पीपल्स को. बँकेत झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमास बँकेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश देवडा, अध्यक्ष सुनील देवडा, उपाध्यक्ष रूपचंद बज, सरव्यवस्थापक संजय राजेश्वर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. हिंगोली शहरातील भाजप कार्यकर्ते डॉ. राजेश भोसले यांच्यासह रोहयो समितीचे माजी सदस्य तथा पदवीधर संघटक पंजाबराव कुटे, कैैलास भुजंगळे यांनी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेस कमिटी हिंगोलीत काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, पं. स. सभापती सी. ए. बनसोडे, संजय गांधी निराधार योजनेचे समितीचे अध्यक्ष आबेदअली जहागीरदार, मिलिंद उबाळे, पं. स. सदस्य संतोष जगताप, उत्तमराव जगताप, रामराव जगताप, ज्ञानेश्वर गोटरे, सुमित चौधरी, कैलास शहाणे, नजीरखाँ पठाण, विश्वासराव बांगर, गणेश साहू, अफरोजअली जहागीरदार, रामचंद्र कावरखे, बंडू बांगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाभरात बंद जिल्हाभरात काही ठिकाणी बुधवारी बंद पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. हिंगोली शहरात सकाळपासून बंद पाळण्यात आला. शहरातील बहुतांश दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, व्यापरी पेठा बंद होत्या. मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. सकाळपासून बरीच दुकाने बंद होती; पण बुधवारी मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात आला. वसमत शहरात कडकडीत बंद वसमत : शहरात मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून बुधवारी वसमत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास व्यापार्‍यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. परिणामी बुधवारी वसमत कडकडीत बंद राहिले. मुंडे यांचे निधन झाल्याने वसमतमध्ये मंगळवारी श्रद्धांजली वाहून बुधवारी सर्वपक्षीय बंद पाळण्याचा निर्णय झाला. शहरातील सर्व व्यापार्‍यांनी बुधवारी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने कडकडीत बंद राहिला. आजचा बंद अभूतपूर्व राहिला. व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासून उघडली नाहीत. दिवसभर सर्व लहान मोठी दुकाने व सर्व व्यवहार बंद होते. आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफाटा येथे बंद पाळण्यात आला. त्यात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक गावांत भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. वारंगा येथे व्यापार्‍यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पं. स. सदस्य विजय अवचार, नारायण सावळे, दत्ता करपे, तुकाराम ढोणे आदी उपस्थित होते. पानकनेरगाव येथे बंद पानकनेरगाव : येथे बुधवारी दिवसभर कडकडीत बंद पाळून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. व्यापार्‍यांनीसुुद्धा आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून दु:ख व्यक्त केले. पानकनेरगाव येथे ३३ के. व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. कुरूंदा येथे दुकाने बंद कुरूंदा : येथे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल ४ जून रोजी व्यापार्‍यांनी आपआपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. तसेच नर्सी नामदेव, हट्टा येथेही बंद पाळण्यात आला. (वार्ताहर)