महामार्गावरील झाडे बनली धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:22 IST2019-05-27T21:22:05+5:302019-05-27T21:22:44+5:30
औरंगाबाद-नगर महामार्गावरील रस्त्यालगत असलेली झाडे धोकादायक बनली आहे.

महामार्गावरील झाडे बनली धोकादायक
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील रस्त्यालगत असलेली झाडे धोकादायक बनली आहे. कोणत्याही क्षणी झाड कोसळण्याची शक्यता असून, यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या महामार्गावर गोलवाडी फाट्यापासून ते कामगार चौकापर्यंत अनेक मोठ मोठी झाडे असून, फांद्या रस्त्यालगत पसरलेल्या आहेत. याती काही झाडे जीर्ण झाल्याने वाळून गेली आहेत.
गतवर्षी पावसाळ्यात वादळी वाऱ्याने कामगार चौकातील दोन निलगिरीची झाडे उन्मळून मुख्य रस्त्यावर पडली होती. तसेच साऊथसिटी जवळील वडाच्या झाडाची मोठी फांदी तुटून रस्त्यावर पडली होती. मात्र, या दोन्ही घटनांत सुदैवाने रस्त्यावर वाहने नसल्याने दुर्घटना झाली नाही.
पावसाळा तोंडावर आला असून वादळी वाºयामुळे रस्त्यालगतची जीर्ण झाडे व झाडांच्या फांद्या कोणत्याही क्षणी तुटून पडण्याची दाट शक्यता आहे. साऊथसिटी चौकालगत असलेले वडाचे झाडे पूर्णपणे जीर्ण झाल्याने कधीही पडून मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे प्रशासनाने या जीर्ण झाडाकडे वेळीच लक्ष देवून धोकादायक झाडे व फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.