पोखरी येथे कृषीदिनानिमित्त वृक्ष दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:34 IST2019-07-02T22:34:10+5:302019-07-02T22:34:27+5:30

औरंगाबाद तालुक्यातील पोखरी येथे वृक्षदिंडी काढण्यात आली.

Tree Dindi for the day of Agriculture Day at Pokhri | पोखरी येथे कृषीदिनानिमित्त वृक्ष दिंडी

पोखरी येथे कृषीदिनानिमित्त वृक्ष दिंडी

शेंद्रा : पोखरी येथे धनेश्वरी मानव विकास मंडळ संचलित कृषि महाविद्यालय, गेवराई तांडा येतील कृषि विद्यार्थ्यांनी १ जुले रोजी कृषि दिनानिमित्त औरंगाबाद तालुक्यातील पोखरी येथे वृक्षदिंडी काढण्यात आली.

या प्रसंगी कृषी दिंडीच्या माध्यमातून शाळेतील मुलांना व गावातील शेतकऱ्यांना झाडांचे महत्त्व पटवून त्याचा हवामानावर होणारा परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. येथील कृषिमित्र गेल्या पाच महिन्यांपासून गावात राहत असल्यामुळे ते वेळो वेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करत आहेत.


गावात काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या वेळी सरपंच अमोल काकडे, चेअरमन राधकीसन हरणे, कृषीमित्र रवींद्र शिंदे, बाबूराव शिंदे, संघर्ष येवले, सुनील नागरे, धनंजय घायवट, पवन सोनवणे यांच्यासह जी.प. शाळेचे प्राचार्य सवई, इतर शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Tree Dindi for the day of Agriculture Day at Pokhri