कचराकोंडी प्रश्नी शिवसेनेला आठ दिवसांची मुदत; भाजपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:12 AM2018-07-20T11:12:43+5:302018-07-20T11:13:31+5:30

शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले.

Trash questioned Shiv Sena's eight-day deadline; BJP's role | कचराकोंडी प्रश्नी शिवसेनेला आठ दिवसांची मुदत; भाजपची भूमिका

कचराकोंडी प्रश्नी शिवसेनेला आठ दिवसांची मुदत; भाजपची भूमिका

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले. मात्र कचराकोंडीमुळे शहरातील जनता त्रस्त असताना महापालिकेतील सत्ता सोडण्यास भाजप तयार नाही, असे चित्र आहे. 

कचरा, जलवाहिनी, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामांवरून मनपात सुरू झालेल्या राजकीय गदारोळाचा आठ दिवसांत सोक्षमोक्ष लागला नाही, तर भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून महापालिका बरखास्त करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करु असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी आज पत्रकार स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक दिलीप थोरात, जालिंदर शेंडगे आदींची उपस्थिती होती. 

तनवाणी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकण्याची काय गरज होती. पालिकेत महापौर शिवसेनेचा असताना तेथे जाऊन कचरा टाकून त्यांनी काय साध्य केले, कचऱ्याच्या प्रकरणात शासनाने ८१ कोटींचा डीपीआर मंजूर करून दिला. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक घेऊन मनपा बरखास्तीचे केलेले विधान चुकीचे नाही. पाच महिन्यांपासून पालिकेतील राजकारण, प्रशासन नागरिकांना वेठीस धरत असेल तर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. खा. चंद्रकांत खैरे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर आरोप करीत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार शहरात कचरा टाकू देण्यास विरोध करीत आहेत. कचऱ्याचे राजकारण कोण करीत आहे, यातून स्पष्ट होते. खा. खैरे यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. दरम्यान भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राष्ट्रध्वजासमोर कचरा आणून टाकणाऱ्या आंदोलकांवर कारवाईची मागणी केली.

आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार 
महापौर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना  कचरा समस्या महत्त्वाची वाटत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची बैठक टाळून ते मातोश्रीवर बैठकीला ेगेले. यावरून शिवसेनेला किती गांभीर्य आहे, हे स्पष्ट होते. परिस्थिती सुधारली नाही तर येत्या आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटून बरखास्तीबाबत निवेदन देण्यात येईल, 
- किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष

पालिका बरखास्त करून प्रश्न सुटेल का?
महापौर शिवसेना-भाजप युतीचा आहे. मागील २७ वर्षांपासून पालिकेत युती आहे. भाजपने सहकार्याची भावना ठेवली तर मिळून शहरातील समस्या सोडविणे शक्य होईल. राजकीय भावनेतून विधाने करण्यापेक्षा सोबत यावे. पालिकेतील चांगल्या आणि वाईट निर्णयाला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. पालिका बरखास्त करून प्रश्न सुटणार आहे का? 
- नंदकुमार घोडेले, महापौर

मला तर आत्महत्या करण्याची वेळ आणली असती
माझ्या काळात शहरातील कचऱ्याची समस्या निर्माण झाली असती तर शिवसेनेने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली असती.
- भगवान घडामोडे, माजी महापौर, भाजप

Web Title: Trash questioned Shiv Sena's eight-day deadline; BJP's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.