ट्रॉन्सपोर्टचे गोदामातून पाच लाखांचे साहित्य लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:50 PM2019-11-30T22:50:20+5:302019-11-30T22:50:20+5:30

वाळूज एमआयडीसीत एका ट्रॉन्सपोर्टचे गोदाम फोडून चोरट्यांनी जवळपास ५ लाखांचे साहित्य लांबविल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली.

Transport worth five lakhs of warehouses were removed from the warehouse | ट्रॉन्सपोर्टचे गोदामातून पाच लाखांचे साहित्य लांबविले

ट्रॉन्सपोर्टचे गोदामातून पाच लाखांचे साहित्य लांबविले

googlenewsNext



वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत एका ट्रॉन्सपोर्टचे गोदाम फोडून चोरट्यांनी जवळपास ५ लाखांचे साहित्य लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.


वाळूज एमआयडीसीतील एपिल कॉर्गो कॅरिअर प्रा.लि.(प्लॉट नंबर सी-२३३) येथे कंपनीचे गोदाम आहेत. या गोदामात राकेशकुमार कृपालसिंह फोगाट हे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात. फोगाट यांनी गुरुवारी (दि.२८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोदामाला कुलूप लावून ते सिडको वाळूज महानगरातील घरी गेले.

शुक्रवारी फोगाट हे गोदामाजवळ आले असता त्यांना गोदामाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर त्यांनी गोदाम उघडून आत पाहणी केली असता त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

राकेशकुमार यांनी शनिवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जवळपास ५ लाख रुपये किमतीचे साहित्याची चोरी झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी चोरट्यांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Transport worth five lakhs of warehouses were removed from the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.