ट्रान्सफॉर्मरची तांब्याची तार चोरणारी टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:47 IST2019-06-03T22:47:18+5:302019-06-03T22:47:36+5:30
शेंद्रा एमआयडीसीमधून ट्रान्सफॉर्मरची तांब्याची तार चोरणारी टोळी पोलिसांनी पकडली.

ट्रान्सफॉर्मरची तांब्याची तार चोरणारी टोळी पकडली
करमाड : शेंद्रा एमआयडीसीमधून ट्रान्सफॉर्मरची तांब्याची तार चोरणारी टोळी पोलिसांनी पकडली. अटक केलेल्यांमध्ये कृष्णा कडूबा दांडगे(२७ रा.आमठाणा ता.सिल्लोड),गजानन आसाराम घावटे (३० रा.नक्षत्रवाडी,औरंगाबाद),सोहनलाल चंपालाल गुर्जर (२३ रा.रांजनगाव,औरंगाबाद),सईद नशीर शेख (२० रा. पिंपळवाडी ता.पैठण),संजय पांडुरंग राजगे (२२ रा.पिंपळवाडी ता.पैठण) यांचा समावेश आहे.
शेंद्रा एमआयडीसीतील कनक पाइप कंपनीतील वॉचमन राहुल उकंडी ढेंबरे यांना रविवारी मध्यरात्रीनंतर २.३० च्या सुमारास कंपनीच्या मागील बाजूच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरजवळ काही चोरटे दिसून आले. त्यांनी कंपनी मालकांना फोनवर माहिती दिली. सारडा यांना माहिती मिळताच त्यांनी करमाड पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन चोरट्यांना पकडले, तर इतर तीन आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. यापूवीर्ही शेंद्रा एमआयडीसीतून ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार चोरण्याच्या घटना घडल्या आहेत. राहुल ढेंबरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, सचिन राठोड, अनिल गायकवाड,नागनाथ केंद्रे करीत आहेत.