आवाडांनी केला पारधी पेढीचा कायापालट

By Admin | Updated: May 26, 2015 00:47 IST2015-05-26T00:16:55+5:302015-05-26T00:47:04+5:30

बालाजी बिराजदार , लोहारा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा झुंजार नेता आज आमच्यात नाही हे मनाला पटत नाही. वंचितांच्या हक्कासाठी परिणामांची पर्वा न करता लढायचे बळ ‘जिजा’नेच आम्हाला दिले

Transformation of paradhi fund | आवाडांनी केला पारधी पेढीचा कायापालट

आवाडांनी केला पारधी पेढीचा कायापालट



बालाजी बिराजदार , लोहारा
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा झुंजार नेता आज आमच्यात नाही हे मनाला पटत नाही. वंचितांच्या हक्कासाठी परिणामांची पर्वा न करता लढायचे बळ ‘जिजा’नेच आम्हाला दिले. एकनाथ आवाड आमच्यासाठी खऱ्या अर्थाने मायबाप होते. अशी प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानचे राजकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
१९९३ साली एकनाथ आवाड यांनी मानवी हक्क अभियान या संघटनेची स्थापना केली. तेंव्हापासून मी आवाडांसोबत काम करीत आहे. चळवळीतील अनेक कार्यकर्ते या नेत्याला ‘जिजा’ या नावानेच संबोधत असत. त्यांच्यासोबतच विवेक पंडित, दत्ता खंडागळे, कैलास पवार, मोहन ताटे, बजरंग ताटे असे आम्ही सर्वजण कार्यरत होतो. १९९३ साली लोहारा-उमरगा तालुक्यात भूकंप झाला. ही बातमी समजल्यानंतर एकनाथ आवाड उस्मानाबादेत धावून आले. भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित केले. या कामासाठीच भूकंपग्रस्त भागातील पेठसांगवी येथे अभियानाचे कार्यालय सुरु करण्यात आले. प्रत्येक कामात एकनाथ आवाड आमच्यासोबत असायचे. आमच्याबरोबरच जेवण करायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हायचे. या हक्काच्या कार्यकर्त्यांना सोबतच घेवूनच त्यांनी वंचितासाठी अनेक लढे लढले. विशेषत: भूमीहिनांना गायरान जमिनी द्याव्यात, यासाठी त्यांनी मराठवाड्यात मोठे काम केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागातील भूमीहिनांना त्यांच्यामुळेच हक्काच्या जमिनी मिळाल्या. गरीब, कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलनाला पर्याय नाही. आंदोलनाचा मार्ग बाबासाहेबांनी आम्हाला दिलाय. त्याचा योग्य वापर करा, असे ते म्हणायचे. आंबेडकरांनी कायद्यात वंचित कष्टकऱ्यांसाठी काय तरतुदी केल्यात ते सांगायचे. यातूनच माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते घडले, असे राजकुमार गायकवाड यांनी सांगितले.
फुलवाडी येथे माझे दलित कुटुंबाचे एकच घर. २००२ साली गावातील काहीजणांशी वाद-विवाद झाला. याप्रकरणी मी पोलिसात तक्रार दिली. मात्र तरीही प्रकरण मिटेना. म्हणून माजलगावला जावून घडलेली घटना एकनाथ आवाड यांना सांगितली. त्यानंतर आवाड स्वत: फुलवाडीत आले. सर्वांसमक्ष माझ्या खांद्यावर हात ठेवला. आमचा कार्यकर्ता कोणावर अन्याय करणार नाही. मात्र कोणाचा अन्यायही आम्ही सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते, अशी आठवणही गायकवाड यांनी सांगितली.

Web Title: Transformation of paradhi fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.